त्याचा प्रत्येक शब्द कानावाटे हृदयाला बोचत होता !
उमा पाटील त्याचा प्रत्येक शब्द कानावाटे हृदयाला बोचत होता ! नमस्कार खरंतर यावर बोलायचं म्हटलं तर सर्व सामान्य लोकांची दातखिळी बसते. जर कोणी या विषयावर बोलत असेल तर त्यांच्या विषयी माणसांच्या मनामध्ये नको ते विचार येत राहतात आज संपूर्ण भारत बंद आहे.आज कोणीही घराच्या बाहेर निघत नाहीत कारण बाहेर कोरोनाचे संकट एवढे मोठे आहे की आपण श्वास घेतल्यावर जगतो पण आज बाहेर ही परिस्थिती आहे की श्वास घेतला तर जीव जातोय आज सहजच घराच्या बाल्कनीत बसलो असता तोच टाळीचा आवाज आला जो गेल्या दोन ते दीडवर्षात कधी आला नव्हता .रोज ऑफिस ला जाताना ट्रेन मध्ये हा-हा आवाज यायचा,हा आवाज आला की आपोआप माझा हात हा माझ्या खिशात असलेल्या सुट्या पैशांकडे जायचा.मिळेल ते दीड दोन रुपये घेऊन ती व्यक्ती मला ओंजळीं भरून आशीर्वाद द्यायची.दीड दोन रुपयां मध्ये एवढा आशीर्वाद मिळायचा याचे मला कौतुक वाटायचे.आज बाहेर तोच आवाज येत होता डोळे फिरवत जेव्हा मी बघितलं तेव्हा मला एक हताश झालेला ट्रान्सजेंडर दिसला. रस्त्यावर लोक नाहीत असेल तरी कोणी पैसे देत नाहीत पैसे...