त्याचा प्रत्येक शब्द कानावाटे हृदयाला बोचत होता !

उमा पाटील
त्याचा प्रत्येक शब्द कानावाटे हृदयाला बोचत होता !
नमस्कार खरंतर यावर बोलायचं म्हटलं तर सर्व सामान्य लोकांची दातखिळी बसते.
जर कोणी या विषयावर बोलत असेल तर त्यांच्या विषयी माणसांच्या मनामध्ये नको ते विचार येत राहतात
आज संपूर्ण भारत बंद आहे.आज कोणीही घराच्या बाहेर निघत नाहीत कारण बाहेर कोरोनाचे संकट एवढे मोठे आहे की आपण श्वास घेतल्यावर जगतो पण आज बाहेर ही परिस्थिती आहे की श्वास घेतला तर जीव जातोय
आज सहजच घराच्या बाल्कनीत बसलो असता तोच टाळीचा आवाज आला जो गेल्या दोन ते दीडवर्षात कधी आला नव्हता .रोज ऑफिस ला जाताना ट्रेन मध्ये हा-हा आवाज यायचा,हा आवाज आला की आपोआप माझा हात हा माझ्या खिशात असलेल्या सुट्या पैशांकडे जायचा.मिळेल ते दीड दोन रुपये घेऊन ती व्यक्ती मला ओंजळीं भरून आशीर्वाद द्यायची.दीड दोन रुपयां मध्ये एवढा आशीर्वाद मिळायचा याचे मला कौतुक वाटायचे.आज बाहेर तोच आवाज येत होता डोळे फिरवत जेव्हा मी बघितलं तेव्हा मला एक हताश झालेला ट्रान्सजेंडर दिसला.
रस्त्यावर लोक नाहीत असेल तरी कोणी पैसे देत नाहीत पैसे तर सोडा पण कोणीच नीट बोलत सुद्धा नाहीत . कोणी छक्का , कोणी हेमल्या , कोणी गे, कोणी तर लांबून दगड मारतात आणि मिळेल त्या रस्त्याने पळ काढतात.
“ मी ट्रान्सजेंडर आहे यात माझी चूक नाही निसर्गानेच माझ्यावर हा अन्याय केला आहे तर मी कोणा पुढे हात पसरू माझे मलाच कळत नाही . मी रस्त्यावर भीक मागतो सगळ्यांसमोर हात पसरतो कोणी एक-दोन रुपये देतात तर कोणी अंगावर धाऊन आलेल्याला कुत्र्यासारखं पुढे जा म्हणतात मला माहीत आहे याचा त्रास प्रत्येकाला होतो
पण मी स्वतःहून कधीच टाळी वाजवत नाही ते मला आवडत ही नाही पण मला टाळी वाजवायला ही तुम्हीच प्रयुक्त्त करता तुम्ही मला व माझ्या सारख्या कित्येक जणांना काम देत नाहीत कारण मी एक ट्रान्सजेन्डर आहे म्हणून अहो मी पण हाडामासाचाच जीव आहे मला पण भावना आहेत माझ्या ही शरीरामध्ये धावणाऱ्या रक्तातचा रंग हा लालच आहे अहो मला पण पोट आहे जे प्रत्येक रात्री भुकेने व्याकूळ होते. आज दोन दिवस झाले मी पोटभर जेवलेलो नाही कारण माझ्या कडे पैसे नाहीत आता पैसे नाही तर अन्न तरी काय मिळणार ?
लॉकडाऊन च्या सुरुवातीला जे काही कमावलेलं होत ते सगळं संपलं आता काय त्या पेटलेल्या पोटात भरावं जेणे करून ते शांत होईल मला काहीच सुचत नाही आम्ही काम करायला कधीच नाही असं म्हटलं नाही. आम्हाला काम द्या आम्ही कोणा समोर हात पसरावणार नाही मरणाच्या दारावर आहे पण मला मरण येत नाही ! अशी माझी परिस्थिती आहे ”
जेव्हा मी हे ऐकत होतो तेव्हा ऐकू की नको ऐकू .मला कळत न्हवत कारण त्याचा प्रत्येक शब्द कानावाटे हृदयाला बोचत होता !
माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे जे कोणी हा लेख वाचत असाल ते प्रत्येक जण आपल्या आजूबाजूला सणाऱ्या ट्रान्सजेन्डर ची मदत करा निदान त्यांना काम द्या जेणे करून एक जिवंत जीव मारणार नाही.
लेख: विक्रम संतोष फलटणकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा